Advertisement

मुलीची लग्नपत्रिका वाटप करून येणाऱ्या वधू पित्याचा अपघाती मृत्यु

प्रजापत्र | Monday, 07/11/2022
बातमी शेअर करा

परळी वैजनाथ दि.७ (प्रतीनिधी) - मुलीच्या लग्नाच्या पत्रिका नातेवाईकांना वाटप करून गावाकडे निघालेल्या 52 वर्षीय पित्याच्या गाडीला अपघात झालेल्या सुवर्णकार सुभाष दीक्षित यांचे  बीड येथे उपचारादरम्यान मरण पावल्याची घटना रविवार (दि.6) रोजी रात्रीच्या दरम्यान घडली. या घटनेने परळी शहरातील कंडाक्टर कॉलनी भागात हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

 

सुभाष वसंतराव दिक्षीत (वय 52, रा. कंडक्टर कॉलनी परळी) यांच्या घरातील पहिले शुभ कार्य असलेल्या मुलीचे पुढील महिन्यामध्ये लग्न आहे. लग्नाच्या पत्रिका घेवून दिक्षीत बीड येथे आले होते. पत्रिका वाटप करून ते मोटारसायकलवर परळीकडे निघाले होते. रात्रीच्या वेळी कुप्पा फाट्याजवळ त्यांच्या मोटारसायकलला अपघात झाला. ट्रॉलीला त्यांची गाडी धडकली. यात ते जखमी झाल्याने त्यांना उपचारार्थ जिल्हा रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने शहरात सुवर्णकार बांधवांमध्ये व परिवारात हळहळ व्यक्त केली जात आहे.त्यांच्यावर परळी येथील सार्वजनिक स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले असून त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगी व एक मुलगा असा परिवार आहे.
 

Advertisement

Advertisement