Advertisement

अबब...फराटेच्या काळात दिवसाढवळ्या लोकांना लुटले जाताय

प्रजापत्र | Sunday, 06/11/2022
बातमी शेअर करा

माजलगाव - शहरात चोरट्यानी धुमाकुळ घातला असून  शहरातील एका व्यापाऱ्याच्या अंगावरीक ९० ग्राम सोने दिवसाढवळ्या पसार केल्याने शहरातील पोलीस करतात काय असा सवाल उपस्थित केला जात आहे.

 

 

           कालच जुन्या मोंढ्यातील तीन दुकाने फोडत पोलीस निरीक्षक धनंजय फराटे यांचे नाक कापण्याचे काम ताजेच असताना रविवारी सकाळी शहरातील कापड व्यापारी उत्तम दगडोबा गडम हे नेहमीप्रमाणे मारूतीचे दर्शन घेऊन बाहेर आले असता त्यांना दोघांनी जवळ बोलवत आम्हाला मंगलनाथ मंदिरात मदत करावयाची आहे आम्हाला मदत करा मदत कोणाकडे द्यावी अशी विचारना करत त्यांना गाडीवर बसण्याची विनंती केली त्यानुसार ते मंदिराकडे जाण्यासाठी निघाले असता त्यांना कदम च्या देवी मंदिराकडे नेऊन त्यांना मारहाण करण्यास सुरवात केली त्याठिकाणी आधीच आणखी दोघे जण थांबले होते सदरील घटनेत त्यांच्या अंगावरील सोन्याची चैन आणि अंगठ्या असे ऐकून ९० ग्रॅम सोन्याचा ऐवज घेऊन सदरील चोरट्यानी पोबारा केला.त्यानंतर त्यांनी माजलगाव शहर पोलीस ठाणे गाठत गुन्हा दाखल करण्याचा प्रक्रिया सुरू केली.गेल्या काही दिवसात माजलगावात पोलीस निरीक्षक धनंजय फराटे यांच्या काळात चोऱ्याच्या घटना सातत्याने घडून येत असून शनिवारी एकाच दिवशी तीन दुकाने फोडत पोलिसांचा कर्तव्यशून्यता जिल्ह्यात उघडी केली आहे.
 

 

 

ठाकूर साहेब माजलगाव शहराकडे लक्ष द्या

         माजलगाव शहरात चोरट्याने आव्हान उभे केले असून ते आव्हान पेलण्यास माजलगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आणि पोलीस अकार्यक्षम ठरत आहेत त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी माजलगावकडे लक्ष द्यावे अशी मागणी नागरीक,व्यापारी वर्गातून होत आहे.

Advertisement

Advertisement