Advertisement

चाटगाव तलावाचा सांडवा पुन्हा फोडला

प्रजापत्र | Tuesday, 01/11/2022
बातमी शेअर करा

माजलगाव दि.१ प्रतिनिधी) - दिंद्रुड सह परिसरातील चार ते पाच गावांना पाणीपुरवठा करणार्‍या चाटगाव तलावाचा सांडवा पुन्हा एकदा अज्ञातांनी फोडला असून यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात असून पाटबंधारे विभागाने तात्काळ सांडवा दुरुस्त करावा व अज्ञात आरोपीवर कडक कारवाई करावी अशी मागणी दिंद्रुड परिसरातील ग्रामस्थ करत आहेत.

 

याबाबत सविस्तर वृत्त असे की दिंद्रुड व दिंद्रुड परिसरातील चाटगाव, संगम, कासारी या गावांना पाणीपुरवठा करण्याचे काम चाटगावच्या तलावातून केली जाते परंतु मागच्या काही महिन्यापूर्वी अशाच प्रकारे चाटगाव तलावाचा सांडवा फोडण्यात आला होता परंतु ग्रामस्थांच्या सजगतेमुळे पाटबंधारे विभागाकडून तो दुरुस्त करण्यात आला होता. यावर्षी खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे चाटगाव तलाव पूर्ण क्षमतेने भरला असून त्यामुळे परिसरातील चार ते पाच गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सुटला होता परंतु काही अज्ञात लोकांनी या तलावाचा सांडवा पुन्हा एकदा फोडला असून यामुळे तलावातील लाखो लिटर पाणी वाया जात आहे तरीदेखील पाटबंधारे विभागाने याकडे दुर्लक्ष केले असून यामुळे काही अनुचित प्रकार घडला तर यास जबाबदार कोण अशी चर्चा सर्वत्र होत आहे म्हणून कोणताही अनुचित प्रकार घडण्याच्या अगोदर पाटबंधारे विभागाने सांडवा तात्काळ दुरुस्त करावा व पुन्हा असा प्रकार घडू नये यासाठी अज्ञात आरोपिवर कठोर कारवाई करावी अशी मागणी सर्व ग्रामस्थ करू लागले आहेत.
 

Advertisement

Advertisement