Advertisement

व्यापार्‍याची गळफास घेवून आत्महत्या

प्रजापत्र | Tuesday, 01/11/2022
बातमी शेअर करा

बीड दि.१ (प्रतिनिधी) - तालुक्यातील चौसाळा येथील एका 50 वर्षीय व्यापार्‍याने आपल्या राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. सदरील व्यापार्‍याने कुठल्या कारणावरून आत्महत्या केली हे मात्र समजू शकले नाही. पोलिसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला.

 

विलास पंढरीनाथ बोबडे (वय 50) या व्यापार्‍याने रात्रीच्या दरम्यान आपल्या राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली. हा प्रकार आज सकाळी उघडकीस आल्यानंतर याची माहिती पोलिसांना कळवण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी येवून पंचनामा केला. व्यापार्‍याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.
 

Advertisement

Advertisement