Advertisement

आर्थिक विवंचनेतून विवाहितेची आत्महत्या

प्रजापत्र | Monday, 31/10/2022
बातमी शेअर करा

केज - घर खर्च व इतर खाजगी कामासाठी हातउसने घेतलेले पैसे कसे फेडायचे ? या विचाराने चिंताग्रस्त झालेल्या ३२ वर्षीय महिलेने घरातील स्लॅबच्या हुकाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना जाधवजवळा (ता. केज) येथे घडली. 

 

 

       जाधवजवळा ( ता. केज ) येथील शिवानी अंकुश जाधव ( वय ३२ ) या महिलेने घर खर्च व इतर खाजगी कामासाठी हातउसने पैसे घेतले होते. ते वेळेवर परत करता न आल्याने हे पैसे फेडायचे कसे ? या विचाराने चिंताग्रस्त झालेल्या शिवानी जाधव या महिलेने टोकाची भूमिका घेतली. तिने घरातील स्लॅबच्या हुकाला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे रविवारी ( दि. ३० ) पहाटे ३.४५ वाजेच्या सुमारास उघडकीस आले. या घटनेची माहिती मिळताच प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके, केज ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे, फौजदार राजेश पाटील, पोलीस नाईक त्रिंबक सोपणे, दिलीप गित्ते, संतोष गित्ते यांनी घटनास्थळी भेट दिली. येथील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली. या महिलेस एक मुलगा असून पती अंकुश जाधव यांच्या खबरेवरून केज पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस नाईक त्रिंबक सोपणे हे तपास करताहेत. 
 

Advertisement

Advertisement