परळी वैजनाथ (प्रतीनिधी)- 20 ऑक्टोबर रोजी परळी शहर व तालुक्यात झालेल्या परतीच्या पावसाची अतिवृष्टी झाली होती सर्वत्र या पावसाने हाहाकार माजवला होता. या पावसामुळे आलेल्या पुरात तालुक्यातील गाढे पिंपळ गावातील अक्षय आरगडे नामक युवक पुरात वाहुन गेला होता.
तहसील प्रशासन, एनडीआरएफ, ड्रोनच्या सहाय्याने शोध घेण्यात आला वाहून गेलेल्या युवकाचा शोध लागला नाही. आज अखेर सातव्या दिवशी वाहून गेलेल्या अक्षयचा शोध घेतला असता आज गुरुवार रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास गावाच्या अर्धा कि.मी. अंतरावर अक्षयचा मयत मृतदेह सापडला आहे. घटनास्थळावर तलाठी, मंडळ आदी उपस्थित आहेत.
बातमी शेअर करा