बीड दि.२३ (प्रतिनिधी ) - दिवाळीच्या सणाचा सर्वत्र उत्साह असतानाच बीड तालुक्यातील कपिलधारवाडी येथील एका 31 वर्षीय तरुणाने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. सदरील तरुणाने कुठल्या कारणावरून आत्महत्या केली हे मात्र समजू शकले नाही.
सतीश महादेव शिंदे (वय 31 वर्षे, रा. कपिलधारवाडी) या तरुणाचा मृतदेह आज सकाळी आपल्या राहत्या घरी फाशी घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेने कपिलधार येथे एकच खळबळ उडाली. ऐन दिवाळीच्या धामधूमीत तरुणाने आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. बीड ग्रामीण पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला.
बातमी शेअर करा