Advertisement

सलमान खानला डेंग्यूची लागण

प्रजापत्र | Saturday, 22/10/2022
बातमी शेअर करा

सलमान खानच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. सलमानला डेंग्यू झाल्याचे निदान झाले आहे, त्यामुळे बिग बॉस-16 या शोचे शूटिंग आता रद्द करण्यात आले आहे, सलमान पुढची काही आठवडे हा शो होस्ट करू शकणार नाही. त्याच्या जागी शोला काही दिवसांसाठी नवीन होस्ट मिळणार आहे. सलमान पूर्ण बरा होईपर्यंत करण जोहर बिग बॉस 16 चे काही भाग होस्ट करेल. कलर्स टीव्हीने करण जोहरचा टिझरही रिलीज केला आहे.

 

 

चित्रपटाचे चित्रीकरणही रखडले
सध्या सलमान त्याच्या आगामी ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटाचे शूटिंगही करत होता, मात्र आता प्रकृती अस्वास्थ्यामुळे तो चित्रपटाच्या शूटिंगपासूनही ब्रेक घेणार आहे. बॉलिवूड हंगामाच्या वृत्तानुसार, डेंग्यू झाल्यानंतर डॉक्टरांनी सलमानला विश्रांतीचा सल्ला दिला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सलमान खानने स्वतः करण जोहरला बिग बॉस 16 होस्ट करण्यासाठी राजी केले आहे.

 

 

सलमानने स्वतः करणला फोन करून त्याला शो होस्ट करण्याची विनंती केली. करण सलमानला नकार देऊ शकला नाही. आता करण शोचे पुढील काही एपिसोड होस्ट करताना दिसणार आहे. करण आणि सलमान दोघेही चांगले मित्र आहेत, जेव्हा सर्व कलाकारांनी करणच्या 'कुछ कुछ होता है' या चित्रपटात शाहरुखच्या विरुद्ध साइड हीरोची भूमिका करण्यास नकार दिला होता, तेव्हा सलमाननेच या चित्रपटात भूमिका साकारली होती.

 

 

करणने बिग बॉस ओटीटी होस्ट केला आहे
करणने याआधीही बिग बॉस ओटीटी शो होस्ट केला आहे, ओटीटीवर होस्ट म्हणून करणला खूप पसंती मिळाली होती. 12 वर्षांपासून सलमानला बिग बॉसमध्ये पाहण्याची चाहत्यांना सवय असली तरी करणविषयी चाहत्यांची प्रतिक्रिया काय असेल हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

 

Advertisement

Advertisement