बीड दि.२०(प्रतिनिधी) - लग्नासमारंभात आलेल्या एका मुलाने पाच वर्षीय मुलीसोबत गैरकृत्य केल्याचा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी आरोपीविरोधात पेठ बीड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पेठ बीड भागामध्ये एक लग्न समारंभ आयोजीत करण्यात आलेला होता. या लग्नात एक चौदा वर्षीय मुलगा आला होता. या मुलाने याच भागातील पाच वर्षीय मुलीवर अत्याचार केला. हा प्रकार मुलीच्या आईने बघितल्यानंतर या प्रकरणी पेठ बीड पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बातमी शेअर करा