Advertisement

कोयत्याने जिवे मारण्याचा प्रयत्न- आरोपीस तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा व दंड

प्रजापत्र | Tuesday, 18/10/2022
बातमी शेअर करा

अंबाजोगाई दि. १८ (प्रतिनिधी ) :  जुन्या भांडणाची कुरापत काढून जिवे मारण्याच्या उद्देश्यावरून गंभीर दुखापत केल्याच्या प्रकरणात आरोपीला अंबाजोगाईच्या अंबाजोगाई येथील अप्पर सत्र न्यायाधीश  एस. जे. घरत यांच्या   न्यायालयाने तीन वर्ष कारावासाची शिक्षा व प्रत्येकी दहा हजार रुपये दंड ठोठावला.

 

 अशोक हरिभाऊ शिंदे, रा. जानेगाव, ता. केज, जि. बीड यास त्यांच्या गावातील  अशोक मधुकर शिंदे , कृष्णा बजरंग शिंदे यांनी   शेतात नेवून जुन्या भांडण्याच्या कारणावरून कोयत्याने डोक्यात मारहाण करून  गंभीर दुखापत केली. या फिर्यादवरून फिर्यादीने पोलीस स्टेशनला   गुन्हा नोंद करून दोषारोप पत्र  न्यायालयात सादर करण्यात आले होते. सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे दहा साक्षीदार तपासण्यात आले व मा. न्यायालयाने सदर साक्षीपुरावा व सरकारी वकीलाचा युक्तीवाद ग्राहय धरून  न्यायालयाने आरोपींना कलम ३२४ भा. द.वी. अन्वये तीन वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा व प्रत्येकी दहा हजार रुपये दंड व कलम ३२३ भा. द.वी. अन्वये एक वर्ष कारावासाची शिक्षा व प्रत्येकी एक हजार रूपये दंड ठोठावला.
या प्रकरणात सरकार पक्षातर्फे अॅड. आर. एम. ढेले यांनी काम पाहीले व त्यांना वरीष्ठ सरकारी वकील अशोक कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. सदर प्रकरणात कोर्ट पैरवी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक श्री रवी जमादार आणि पोलीस पैरवी म्हणून पो. कॉ. बाबुराव सोडगीर व पो.हे.कॉ. श्रीमती एस. डी. कागणे यांनी काम पाहीले.

 

Advertisement

Advertisement