Advertisement

भेसळयुक्त माव्याचा साठा जप्त

प्रजापत्र | Monday, 17/10/2022
बातमी शेअर करा

केज-सणासुदीच्या काळात बाजारपेठेत मिठाई, खवा, मावा, नमकीन अन्नपदार्थाना मोठ्या प्रमाणात मागणी असते. या काळात अन्नपदार्थामध्ये भेसळ होण्याची तसेच कमी दर्जा अन्नपदार्थ उत्पादन व विक्री होण्याची शक्यता असल्याने बीड जिल्ह्यात अन्न प्रशासन विभागाने पदार्थांची तपासणी मोहीम राबविण्यास सुरुवात केली असून सोमवारी दुपारी केजमध्ये भेसळयुक्त माव्याचा साठा जप्त करत नष्ट करण्यात आला. ही कारवाई अन्न प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त सय्यद इम्रान हाश्मी व अन्न सुरक्षा अधिकारी महेंद्र गायकवाड यांनी केली.

   केजमधील राधेश्याम डेरी, जलाल नगर येथील पेढीची तपासणी अन्न प्रशासन विभागाच्या वतीने करण्यात आली.यावेळी पेढीतून स्कीम मिल्क वापरून मावा बनवताना आढळून आला. यामध्ये  मावाचा साठा - २० किलो (किंमत ३२००/-) आणि स्कीम मिल्क पावडर १८ किलो (किंमत ५८५०/-) एकूण रु ९०५०/- चा साठा जप्त करून नष्ट करण्यात आला.दरम्यान ग्राहकांना सुरक्षित, निर्भेळ व सकस अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत या करिता जिल्हाभर तपासणी मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती हाश्मी यांनी दिली आहे. या कारवाईत अन्न सुरक्षा अधिकारी महेंद्र गायकवाड, नमुना सहायक उमेश कांबळे व वाहन चालक भास्कर घोडके यांचा समावेश होता.

Advertisement

Advertisement