Advertisement

अध्यक्षासह सभासदांच्या बोगस सह्या करून राजीनामे दिल्याचे दाखविले

प्रजापत्र | Sunday, 16/10/2022
बातमी शेअर करा

केज - तांबवा ( ता. केज ) येथील कै. यशवंतराव चाटे शिक्षण व तांत्रिक प्रशिक्षण संस्थेच्या सचिवाने संस्थेच्या अध्यक्षासह दोन सभासदाच्या बोगस सह्या करून त्यांचे राजीनामे मंजूर करून घेत त्यांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी केज पोलिसात संस्थेचे सचिव शिवाजी चाटेविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. 

 

 

तांबवा ( ता. केज ) येथील कै. यशवंतराव चाटे शिक्षण व तांत्रिक प्रशिक्षण संस्थे अंतर्गत संस्थेअंतर्गत कॉलेज, इंग्लीश स्कुल, कॅम्प्युटर इंन्स्टीटयूट असून या मार्फत संस्थेत येणाऱ्या अनुदान व इतर पैशाचा केवळ स्वत:लाच उपभोग घेता यावा या उद्देशाने संस्थेचे सचिव शिवाजी भगवानराव चाटे यांनी त्यांच्या पत्नी, मामाचा मुलगा, आई या घरातील सदस्यांना संस्थेचे गैरमार्गाने सभासद बनविले आहे. त्यानंतर संस्थेच्या अध्यक्ष गयाबाई रामधन चाटे व इतर दोन सभासद हे अजीव सभासद असताना व त्यांनी राजीनामा च्या बोगस सह्या करून संस्थेचे सचिव शिवाजी भगवानराव चाटे यांनी राजीनामे दिल्याचे दाखवून धर्मादाय उपायुक्तांकडे त्यांचे खोटे व बनावट शपथपत्र दाखल केले. त्यांच्याकडून त्यांचे राजीनामे मंजूर करून घेत त्यांनी घरातील सदस्यांचे संबंधित पदावर निवड झाल्याचा फेरफार मंजूर करून घेत संबंधित कार्यालयाची, शासनाची व संबंधित पदाधिकाऱ्यांची दिशाभुल व फसवणुक केली. संस्थेच्या कारभारामध्ये गैरव्यवहार, भ्रष्टाचार केला आहे. अशी फिर्याद संस्थेच्या अध्यक्ष गयाबाई चाटे यांनी दिल्यावरून संस्थेचे सचिव शिवाजी चाटे यांच्याविरुद्ध केज पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. फौजदार राजेश पाटील हे पुढील तपास करत आहेत. 
 

Advertisement

Advertisement