Advertisement

अन्नातून विषबाधा

प्रजापत्र | Thursday, 13/10/2022
बातमी शेअर करा

माजलगाव दि.१३ (प्रतिनिधी)-शहरातील नव्याने सुरु झालेल्या एका हॉटेलमध्ये जेवून केल्यामुळे पाच जणांना उलटी,मळमळचा त्रास सुरु झाल्याचा प्रकार समोर आला आहे.या हॉटेलमधील शिरे पदार्थ खाण्यात आल्यामुळे हा त्रास झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

   दि.११ व १२ रोजी गुंजथडी येथील रोहित नायबळ,अतुल डाके (रा.डाके पिंप्री,) व अन्य तिघांनी माजलगावच्या गायत्री हॉटेलमध्ये पनीर आणि वटण्याची भाजी खाल्यानंतर मळमळ,आणि उलटीचा त्रास सुरू झाला.त्यामुळे या पाच जणांवर माजलगावच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.सध्या या सर्वांची प्रकृती ठणठणीत असल्याची माहिती आहे.

 

 

 

कारवाई करू

ज्या हॉटेलमधील अन्नातून विषबाधा झाली आहे,त्याबाबत तपास करण्यात येणार आहे.ग्राहकांना देणाऱ्या येणाऱ्या जेवणातील पदार्थांचा दर्जा तपासण्यात येणार असून याबाबत कठोर कारवाई करण्याचा इशारा अन्न प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त सय्यद इम्रान हाश्मी यांनी दिला.

Advertisement

Advertisement