Advertisement

भरधाव ट्रकच्या धडकेत शेतकऱ्याचा मृत्यू

प्रजापत्र | Sunday, 09/10/2022
बातमी शेअर करा

अंबाजोगाई - भरधाव वेगातील मालवाहू ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत शेतकऱ्याचा मृत्यू झाला. हा अपघात अंबाजोगाई तालुक्यातील पूस येथे महामार्गावर शनिवारी (दि.०८) सायंकाळी घडला. 

 

मधुकर ज्ञानोबा हाके (वय ५५, रा. पूस, ता. अंबाजोगाई) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. शनिवार सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास मधुकर हाके हे जवळगावकडे असलेल्या शेतातून घरी जाण्यासाठी दुचाकीवरून निघाले होते. ते अंबाजोगाई - अहमदपूर महामार्गावर छत्रपती शिवाजी महाराज चौकात आले असताना अहमदपूरकडे जाणाऱ्या एका मालवाहू ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात मधुकर हाके गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी स्वाराती रुग्णालयात दाखल केले असता तिथे डॉक्टरांनी तपासून त्यांना मयत घोषित केले. मधुकर हाके यांच्या अपघाती मृत्यूबद्दल पूस सह पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. दरम्यान, घटनास्थळी संतप्त ग्रामस्थांनी ट्रकचालकास चोप देऊन ट्रक व चालकास बर्दापूर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

Advertisement

Advertisement