फ्रेंच लेखिका अॅनी अॅर्नोक्स यांना 2022 चा साहित्यातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्कार समितीच्या मते, अॅर्नोक्स यांना त्यांचे साहस आणि समाजातील सत्य मांडण्याच्या कलेसाठी हा सन्मान देण्यात आला आहे. समाजापासून अलिप्त राहून व्यक्ती आणि समाज यांच्यातील विरोधाभासावर भाष्य करता येईल. पण, स्वत:ला एक पात्र समजून, आपल्या आठवणीतील वेगवेगळे काळ उलगडून समाजाची कहाणी मांडणे हा लेखनाचा धाडसी प्रकार आहे, असे समितीने म्हटले आहे. अॅनी अॅर्नोक्स पालकांच्या मुलांशी असलेल्या नातेसंबंधांवर लिहितात. विशेषतः मुलींवर होणाऱ्या परिणामांवर त्यांनी लिखाण केलेले आहे.
तारुण्यातील चूक समाज माफ करत नाही, सरकारही समाजाबराेबरच उभे असल्याचे दिसते १९४० मध्ये जन्मलेल्या अॅर्नोक्सचे पहिले पुस्तक क्लीन आऊट १९७४ मध्ये प्रकाशित झाले. त्यातील मुख्य पात्र सामाजिक श्रद्धा आणि गर्भपाताबद्दलच्या वैयक्तिक भावना यांच्यातील संघर्ष सहन करते. तेव्हा फ्रान्समध्ये गर्भपात बेकायदेशीर होता. हे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर वर्षभरातच हा कायदा लवचिक करण्यात आला. २ वर्षांनंतर ताे लागू झाला. २००० मध्ये प्रकाशित झालेल्या ‘हॅपनिंग’ या पुस्तकात गर्भपाताचा मुद्दा जोर धरेल, अशी भीती होती. या पुस्तकात संस्कारांची गीते सामाजिक प्रथा निश्चित करतात आणि राजकारण कायदे करून संस्कारांचे रक्षक बनते. पण त्यातून स्त्रियांचे त्यांच्या जीवनावरील नियंत्रण संपते. २०२१ मध्ये या पुस्तकावर आधारित ‘हॅपनिंग’ या चित्रपटाला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गोल्डन लायन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
अॅर्नोक्सच्या लेखनातील व्यक्तिरेखा समाजाचा एक भाग असूनही समाजातील सत्य मांडते. ‘हॅपनिंग’ चित्रपटासाठी पुरस्कार जिंकल्यानंतर गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये स्वित्झर्लंडमध्ये दिलेल्या मुलाखतीत अॅनी म्हणते की, समाजाच्या एका वर्गाकडून दुसऱ्या वर्गात प्रगती करण्यासाठी महिलांना सामाजिक बहिष्काराचा सामना करावा लागतो. स्वत:चे अनुभव साक्षीदार मानून ती म्हणते की, तरुण वयात जाणीव आणि ज्ञान यांच्यात समतोल साधणे हे सर्वात मोठे आव्हान आहे. कारण या वयातील चूक समाज माफ करत नाही. सरकारही समाजाच्या पाठीशी उभे दिसते. या स्थितीत समाजापासून वेगळे होणे हाच उपाय आहे. ज्यांचे आई-वडील किंवा दोघेही समाज सोडून त्यांना आधार देतात ते भाग्यवान असतात. मात्र बरेच अनेकदा एकटे पडतात. अॅर्नोक्सची पुस्तके या एकाकीपणामुळे काेलमडलेल्या आणि या परिस्थितीवर मात करणाऱ्या पात्रांची कथा सांगतात. अॅनी हे या विजेत्या पात्रांचे जिवंत उदाहरण आहे. साहित्यिक सांगतात की, १९४० ते २००७ या काळात फ्रान्सचा समाज समजून घ्यायचा असेल तर तिचे ‘द इयर्स’ हे पुस्तक वाचायला हवे.