Advertisement

महाराष्ट्रातील एकमेव एफएम केंद्र उभारणार अंबाजोगाईत

प्रजापत्र | Thursday, 29/09/2022
बातमी शेअर करा

अंबाजोगाई दि.29 (प्रतिनिधी)ः देशातील चौदा राज्य व एका केंद्रशाषित प्रदेशात मिळून आकाशवाणी विभागाद्वारे होणारे माहिती प्रसारण, करमणूक, शैक्षणिक, आरोग्य आदी ज्ञानवाहक 41 फ्रिक्वेन्सी मॉड्यूलेशन (एफएम) केंद्रांना नुकतीच मान्यता मिळाली आहे. त्यात महाराष्ट्रातून एकमेव बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईजवळच्या पिंपळा गावानजीकच्या दूरदर्शन केंद्राच्या ठिकाहून एफएम केंद्र सुरू करण्यात येणार असून त्यासाठी 9 कोटी 62 लाख रुपयांच्या निधीसही मान्यता देण्यात आली आहे. या माहितीला अंबाजोगाई (पिंपळा) दूरदर्शन केंद्राचे प्रभारी उपसंचालक एस. व्ही. चापुले यांनी दुजोरा दिला आहे.

 

 

अंबाजोगाईजवळ 10 किलो वॅटचे केंद्र उभारण्यास मान्यता देण्यात आली आहे. या ठिकाणी पूर्वीपासूनच दूरदर्शनचा 150 मीटर उंच मनोरा आहे. इतरही यंत्रणा आहे. पुढील आठ ते नऊ महिन्यात केंद्र सुरू होण्याची शक्यता प्रशासकीय यंत्रणेकडून व्यक्त करण्यात आली आहे. देशातील इतर ठिकाणच्या तुलनेत अंबाजोगाईजवळचे केंद्राची क्षमता मोठी असेल. त्यापेक्षा मोठे गुजरातच्या भूजमधील आहे. तेथे 20 किलो वॅटचे केंद्र उभारण्यास मान्यता देण्यात आली आहे. देशातील ज्या राज्यात मान्यता देण्यात आलेली 41 केंद्र आहेत, त्यामध्ये 1, 5, 10, 20 किलो वॅट क्षमतेच्या केंद्रांचा समावेश आहे.

 

 

यासंदर्भात गेल्या वर्षभरापासून पाठपुरावा सुरू होता. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, खासदार डॉ. प्रीतम मुंडे, खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे पत्रव्यवहार, निवेदन देण्यात आली होती, असे परळी नगर परिषदेचे माजी स्वीकृत सदस्य तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी चेतन सौंदळे यांनी सांगितले.

 

Advertisement

Advertisement