Advertisement

विवाहित तरुणाचा मृतदेह आढळला

प्रजापत्र | Sunday, 25/09/2022
बातमी शेअर करा

केज दि.२५ – तालुक्यातील मस्साजोग येथे एका ३२ वर्षीय (अंदाजे वय) तरुणाचा मृतदेह आढळला असून सदर घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे.

             तालुक्यातील सुनील बाबासाहेब कदम हे औरंगाबाद येथे कामानिमित्त राहत आहेत. मात्र ते कांही कारणास्तव मस्साजोग येथे आले होते.परंतु मस्साजोग – पिंप्री रोडवरील शेतात एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आला.

                सदर घटनेची माहिती मिळताच केज पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अर्जुन बारगजे यांच्या खाजगी रुग्णवाहिकेतून विडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवला आहे.सुनील यांच्या पश्चात आईवडील, पत्नी, एक मुलगी असा परिवार असून सदर घटनेमुळे कुटुंबावर मोठे संकट ओढवले आहे.सदरील घटनेचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Advertisement

Advertisement