Advertisement

सहा महिन्यापूर्वी अंतरजातीय विवाह झालेल्या विवाहितेला पेटवले

प्रजापत्र | Monday, 19/09/2022
बातमी शेअर करा

 वडवणी - 6 महिन्यापूर्वी अंतरजातीय विवाह केलेल्या एका 22 वर्षीय विवाहितेला नवर्‍याने पेटून दिल्याची धक्कादायक घटना वडवणी शहरातील साळींबा रोडवर घडली आहे. गंभीर भाजलेल्या विवाहितेवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असून पोलिसांनी तीचा जवाब नोंदवला आहे.त्यानंतर नवऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे . 

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शेख अंजुम शेख युसुब (वय 22 वर्षे, रा. माजलगाव) हीचा गेल्या काही वर्षापूर्वी औरंगाबाद येथील तरुणाशी विवाह झाला होता. त्यांना एक मुलगा आहे. सुखी संसार सुरु असतांना अंजुमच्या पतीचे अपघातात निधन झाले. तेव्हापासून अंजुम ही आपल्या आई- वडिलासोबत माजलगावात राहत होती. त्यानंतर तीचे आई- वडील हे उपळी ता. वडवणी येथील बळीराम राजाभाऊ इचके यांच्या सोबत उसतोडणीला जात होते. अंजुमही त्यांच्या सोबत उसतोडणीला जावू लागली. त्या दरम्यान अंजुम आणि बळीराम इचके यांची ओळख झाली. अन् ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. गेल्या सहा महिन्यापूर्वी त्यांनी अंतरजातीय विवाह केला. अन् ते वडवणी शहरातील साळींबा रोड येथे किरायाच्या घरात राहू लागले. बळीराम इचके याचही यापूर्वी लग्न झालेले आहे. त्याला दोन मुले आहेत. 15 सप्टेंबर रोजी दोघांमध्ये किरकोळ वाद झाला अन् इचके याने अंजुम हीच्या अंगावर डिझेल टाकून पेटून दिले. गंभीर भाजलेल्या अंजूमवर सध्या जिल्हारुग्णालयात उपचार सुरु असून वडवणी पोलिसांनी तीचा जवाब नोंदून नवऱ्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 

Advertisement

Advertisement