Advertisement

उपोषणकर्त्याच्या अंथरुणात शिरला साप

प्रजापत्र | Sunday, 18/09/2022
बातमी शेअर करा

वडवणी दि.१८ (प्रतिनिधी)-तालुक्यातील जनहिताच्या प्रश्नावर आमरण उपोषणास बसलेले श्रीमंत मुंडे यांच्या अंथरून सापाने शिरताच वेळीच याकडे लक्ष गेल्याने त्यांचा जीव सुदैवाने वाचला आहे.शनिवारी (दि.१७) रात्री वडवणी तहसिलसमोर ही घटना घडली असून याची रविवारी शहरात दिवसभर याची चर्चा सर्वत्र ऐकण्यास मिळाली. 

         वडवणी तालुक्यातील जनतेच्या सेवेकरिता १०८ ॲम्बुलन्स द्या, प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, त्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय सुरू करा , वडवणी तालुक्यासाठी एसटी बस स्थानकासाठी जागेची मोजणी करून एसटी महामंडळाच्या ताब्यात देण्यात या प्रमुख मागणीसाठी १५ ऑगस्ट रोजी श्रीमंत मुंडे हे उपोषणाला बसले होते. यावेळी जिल्हा प्रशासनाने या मागण्या सोडविल्या जातील असे आश्वासन देऊन हे आंदोलन मागे घेण्यास लावले.मात्र महिनाभरानंतर ही प्रश्न प्रलंबित राहिल्याने अखेर श्रीमंत मुंडे यांनी पुन्हा १७ सप्टेंबरपासून आमरण उपोषणाचे हत्यार उपसले.दोन दिवसांपासून त्यांचे हे उपोषण सुरु होते.या दरम्यानच्या काळात त्यांची प्रकृती ही बिघडली आहे.शनिवारी रात्री उपोषणकर्त्याची भेट घेण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दिनकर आंधळे, बाळासाहेब घुगे हे आले होते.यावेळी उपोषणाच्या जागी गादीवर साप पश्चिम दिशेकडून आल्यानंतर खळबळ उडाली.सर्वच उपस्थितांनी यावेळी सपासाप म्हणून ओरडण्यास सुरुवात केली.हा साप श्रीमंत मुंडे यांच्या अंथरुणात शिरल्यामुळे दोघातिघांनी मिळून त्या सापाला त्याठिकाणची ठार मारले. दरम्यान या घटनेत त्यांना कोणतीही दुखापत झाली नसून नशीब बलवत्तर म्हणून जीव वाचला आहे.

 

 

 

उपोषण राहणार सुरूच 

१५ ऑगस्ट रोजी श्रीमंत मुंडे हे वडवणी तहसिल समोर आमरण उपोषणाला बसले होते, त्यावेळी तहसीलदार दत्ता भारस्कर यांनी केले जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांच्यासोबत चर्चा करून १०८ ॲम्बुलन्स देण्याचे आश्वासन दिले होते.मात्र महिनाभरानंतरही प्रश्न प्रलंबित राहिल्याने अखेर १७ सप्टेंबर रोजी पुन्हा मुंडे हे आमरण उपोषणाला बसले आहेत.जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत हे उपोषण सुरूच राहिलं असे श्रीमंत मुंडे प्रजापत्रशी बोलताना म्हटले आहे.

Advertisement

Advertisement