मुंबई-मुंबईतील दसरा मेळाव्यावरून वाद सुरु असतानाच आता राज्याच्या राजकारणातील चर्चित व्यक्तिमत्व असलेल्या करुणा शर्मांनी देखील आणखी नव्या वादाला तोंड फोडले आहे. करुणा शर्मांनी आता भगवान गडावर दसरा मेळावा घेण्याची इच्छा प्रदर्शित केली आहे. त्यावेळी त्यांनी आपण मुंडे कुटुंबाची सून असल्याचेही सांगितले आहे.
पुण्यातील घोरपडी येथे एका कार्यक्रमात करुणा शर्मांनी ही भूमिका घेतली आहे. सगळेजण आपल्या आपल्या पद्धतीने दसरा मेळाव्याचे आयोजन करत आहेत. दसरा मेळावा हा शिवाजी पार्क आणि भगवानगडावर होतो हे माहिती होतं मात्र त्याच्याशिवाय कुठेच होत नाही हे मात्र माहिती नव्हतं. मी वंजारी समाजाची आणि मुंडे परिवाराची सून असून, मीपण दसरा मेळावा भगवानगडावर घेणार असल्याचे करुणा शर्मानी म्हटले आहे. दसरा मेळाव्यासाठी मी स्वतः नामदेव शास्त्री यांच्याकडे जाऊन यासंबंधी स्वतः त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही करूणा यांनी यावेळी सांगितले. मी एका मंत्र्याची बायको असून संघर्ष करत इथपर्यंत पोहोचल्याचेही यावेळी करूणा म्हणाल्या.
बातमी शेअर करा