अंबाजोगाई दि.11 (प्रतिनिधी): नळाला पाणी आल्यामुळे घरात पाणी भरण्यासाठी विद्युत मोटर लावताना शॉक बसून एका 30 वर्षीय तरुणाचा मृत्यु झाला आहे. शहरातील नागसेन भागात रविवारी (दि.11) ही घटना घडली. मागच्या आठ दिवसात विद्युत मोटरेचा शॉक लागून मृत्यु झाल्याची ही दुसरी घटना समोर आली आहे.
आलीम अकबर तांबोळी (वय 30) असे मृत तरुणाचे नाव आहे. आज सकाळी नळाला पाणी आल्यानंतर कलीम हे पाणी भरण्यासाठी मोटर लावत होते. यावेळी त्यांना जोराचा शॉक बसल्याने त्यांचा जागीच मृत्यु झाला. मागच्या आठ दिवसातील ही दुसरी घटना समोर आल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
बातमी शेअर करा