Advertisement

शेतकऱ्याचा विहिरीत बुडून मृत्यु

प्रजापत्र | Saturday, 10/09/2022
बातमी शेअर करा

वडवणी दि.१० (प्रतिनिधी)-तालुक्यातील हिवरगव्हाण येथील दलित वस्ती वरील अल्पभूधारक शेतकरी पिण्याचे पाणी आणण्यासाठी शेतातील विहिरीवर गेला असता पाऊस असल्याने विहिरीवरील चिखलात पाय घसरून विहिरीमधील पाण्यात बुडून अल्पभूधारक शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि.१०) हिवरगव्हाण येथे घडली आहे.

     महादेव गौतम सिरसठ (वय-३५) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. महादेव हे पिण्याचे पाणी आणण्यासाठी शेतातील विहिरीवर आले होते.यावेळी पावसामुळे चिखल झाल्याने त्यांचा तोल गेला आणि ते पाय घसरून विहिरीमध्ये पडले.यात त्यांचा पाण्यात बुडून जागीच मृत्यु झाला. दरम्यान बराच वेळ झाला तरी ते पाणी घरी घेऊन येत नसल्याने त्यांची पत्नी पूजा सिरसठ या विहिरीवर गेल्या असता विहिरीत घागर तरंगताना दिसून आली. यानंतर मयताच्या पत्नीने आरडा ओरड केल्यानंतर गावातील नागरिक घटनास्थळी जमा झाले.दरम्यान यानंतर हा प्रकार समोर आला.घटनेची माहिती वडवणी पोलिसांना मिळाल्यानंतर पंचनामा करून मृतदेह वडवणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले. मयताच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा असा परिवार आहे. सदरील या दुर्दैवी घटनेने हिवरगव्हाण गावावर शोककळा पसरली आहे.

Advertisement

Advertisement