बीड - मोटारसायकलवर पत्नीसह आधार कार्ड दुरूस्तीसाठी जात असतांना अज्ञात ३ ते ४ जणांनी हल्ला केल्याची घटना आज सकाळी ११ वाजता शहरातील साठे चौक परिसरात घडली. यामध्ये तरूणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असुन त्याच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
बीड शहरातील शेख आमेर शेख नसीर (वय ४०) रा.शहेंशाह नगर, बीड हे मोटारसायकलवरून पत्नीसह जात होते. त्याचवेळी तेथील ३ ते ४ जणांनी त्यांना छेडण्याचा प्रयत्न केला. यामुळे शेख आमेर यांनी त्यांना जाब विचारला असता ३ ते ४ जणांनी अचानक शेख
आमेर यांच्यावर हल्ला चढवला. शेख आमेर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असुन त्यांच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी दुपारी उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता.
बातमी शेअर करा