Advertisement

मोटारसायकल पिकअपचा अपघात

प्रजापत्र | Saturday, 03/09/2022
बातमी शेअर करा

केज दि.3 – केज बीड रस्त्यावर एका मोटार सायकलीला भरधाव वेगातील पिकअपने जोराची धडक दिली त्यात मोटार सायकलवरील दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

शनिवार दि. ३ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ११:०० वा केज बीड महामार्ग क्र. ५४८-डी डोनगाव फाटा, पद्मश्री विठ्ठलराव पाटील साखर कारखान्या जवळील अर्णव स्नॅक्स सेंटर जवळ मोटार सायकल क्र. (एम एच ४४/आर ९१२४) ला केज कडून बीडच्या दिशेने जात असलेल्या पिकअप क्र (एम एच २४/ए यु ५६७०) या भरधाव वाहनाने जोराची धडक दिली. यात मोटार सायकलवरील दोघे गंभीर जखमी झाले असून रुग्णवाहिका चालक मकरंद घुले यांनी तात्काळ घटनास्थळी हजर होत जखमींना उपजिल्हा रुग्णालय केज येथे प्रथमोपचार करण्यासाठी दाखल केले.

 

 

दरम्यान अपघाताची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या आदेशा वरून पोलिस उपनिरीक्षक कादरी, त्रिंबक सोपने, शेख पाशा आणि दिलीप गित्ते व गृह रक्षक दलाचे जवान शिवदास आवाड हे अपघातस्थळी हजर झाले.

Advertisement

Advertisement