Advertisement

सर्पदंशाने 17 वर्षीय विद्यार्थीनीचा मृत्यु

प्रजापत्र | Sunday, 28/08/2022
बातमी शेअर करा

केज - बारावी वर्गात शिक्षण घेणार्‍या एका 17 वर्षीय मुलीस रात्री सर्पदंश झाल्याने तिला उपचारासाठी रूग्णालयात घेवून जात असताना सदरील मुलीचा रस्त्यामध्ये दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना तालुक्यातील भाटूंबा येथे घडली आहे. या घटनेने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

 

अश्‍विनी अनंत कापरे या मुलीला रात्री घराजवळ साप चावला. तिला उपचारार्थ केजच्या उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले. मात्र तिची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला केजहून अंबाजोगाईच्या रूग्णालयात घेवून जात असताना रस्त्यामध्ये तिचा दुर्देवी मृत्यू झाला. या घटनेने भाटूंबा येथे हळहळ व्यक्त केली जात आहे.
 

Advertisement

Advertisement