नेकनूर - नेकनूर हद्दीतील वडवाडी येथे गेल्या काही दिवसांपुर्वी दरोडा पडला होता. या दरोड्यात दरोडेखोरांनी नगदी नऊ लाखांसह इतर साहित्य चोरून नेले होते. पोलिसांनी चार आरोपींना जेरबंद केलेले आहे. या आरोपींकडून मोबाईल, सोन्याचे दागिने आणि काही रक्कम जप्त केली. आणखी या प्रकरणातील सहा आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.
नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडवाडी येथील अभिवान अवचर यांच्या घरी गेल्या काही दिवसांपूर्वी दरोडा पडला होता. दरोडेखोरांनी नगदी नऊ लाखांसह इतर सोन्याचे दागिने लुटून नेले होते. या प्रकरणी एलसीबी आणि नेकनूर पोलिसांनी चार दरोडेखोरांना अटक केली. दरोडेखोरांकडून मोबाईल, मिनी गंठण, सोन्याचे लॉकेट, अंगठी, चांदीची अंगठी, चांदीची मूर्ती, चांदीचे पुजा करण्याचे ताट आणि रोख 98 हजार रुपये जप्त करण्यात आले. यातील आणखी सहा आरोपी फरार असून या आरोपींचा शोध सुरू आहे.