परळी - महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे आज शुक्रवारी बीड जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. दुपारी अंबाजोगाईत त्यांनी जिल्हा सैनिक कल्याण मंडळ व रेड क्रॉस सोसायटी यांच्या अधिकान्यासमवेत बैठक घेतली. योगेश्वरी देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर परळी वैजनाथ येथे बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू वैद्यनाथाचे पूजन करून त्यांनी मनोभावे दर्शन घेतले. राज्यपालांचा आजचा मुक्काम परळी वैजनाथ येथेच असणार आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोशारी हे आज दिनांक 19 रोजी अंबाजोगाई येथून दुपारी चार वाजण्याच्या सुमारास परळीत दाखल झाले .४.२० वाजता त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथाच्या मंदिरात दाखल होत मनोभावे पूजाअर्चा करून श्रावण पर्वकाळात प्रभूवद्यनाथाचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने राज्यपालांचा हृदय सत्कार करण्यात आला. वैद्यनाथाची प्रतिमा देऊन राज्यपालांचा यावेळी देवस्थान कमिटीने सत्कार केला. यावेळी वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त राजेश देशमुख, प्रा. प्रदीप देशमुख, प्रा. बाबासाहेब देशमुख, विजयकुमार मेनकुदळे, डॉ. गुरुप्रसाद देशपांडे, नंदकिशोर जाजू, नागोराव देशमुख, रघुवीर देशमुख, जिल्हाधिकारी राधा बिनोद शर्मा यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.