Advertisement

विजेचा शॉक लागून तरुणाचा मृत्यू

प्रजापत्र | Saturday, 13/08/2022
बातमी शेअर करा

केज दि.१३ - तालुक्यातील वरपगाव येथील रहिवासी तथा अभियांत्रिकी चे शिक्षण घेतलेल्या तरुणाचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना दि.१३ ऑगस्ट रोजी दुपारी घडल्याने गावावर शोककळा पसरली आहे.

           तालुक्यातील वरपगाव येथील शेख कुटुंब शेतात एका पत्र्याच्या घरात वास्तव्यास आहे. आज स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त इतरांप्रमाणे तिरंगा लावला होता. परंतु तिरंगा लावल्यानंतर काही वेळाने झेंड्याचा पाईप कलून जवळच असलेल्या तारेवर पडला आणि त्यात मुक्तार शेख नावाच्या तरुणाला विजेचा शॉक बसून त्याचा दुर्दैवी अंत झाला.

               सदरील घटनेची माहिती गावात पसरताच लोकांनी घटनास्थळी धाव घेतली परंतु तोपर्यंत मुक्तार शेख चा मृत्यू झाला होता. दरम्यान केज पोलिसांना खबर देऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी केजच्या उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आला आहे.

               दरम्यान आज सर्वत्र अमृत महोत्सवाची धूम असताना शेख कुटुंबियांवर दुर्दैवी वेळ आल्याने गावावर शोककळा पसरली आहे.

 

Advertisement

Advertisement