बीड(प्रतिनिधी) - शेतात औषध फवारणी करत असताना तोंडात औषध गेल्याने ५५ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यु झाला . हि घटना बीड तालुक्यातील पिंपळगाव मंजरा येथे घडली.
परमेश्वर तुळशीराव खांडे (वय 55) हे कापसावर औषध फवारणी करत असतांना तोंडात औषध गेल्याने बेशुध्द झाले होते. त्यांना उपचारासाठी बीडच्या जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले.उपचारादरम्यान त्यांचा मृत्यु झाला .
बातमी शेअर करा