बीड - शहरातील मिल्लीया माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा (मुलींची) येथे येवुन या मारहाण करत ७ लाख रूपयांची खंडणी मागणाऱ्या मोहंमद जुबेर याच्याविरूध्द शहर पोलीस ठाण्यात खंडणीसह शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
बीड शहरातील मिल्लीया माध्यमिक व उच्च माध्यमिक ( मुलींची) शाळेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य सिद्दीकी मोहंमद इरफान सादुल्ला यांनी बीड शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. २ ऑगस्ट रोजी ते शाळेतील इतर शिक्षकांसोबत उपस्थित असतांना त्याठिकाणी आलेल्या मोहम्मद जुबेर उल्ला खान (रा. शहेंशाह नगर, बीड) याने माझ्याकडे ७ लाख रूपयांच्या खंडणीची मागणी करून शिवीगाळ करत लाथा बुक्याने मारहाण केली व जिवे मारण्याची धमकी देवून शासकीय कामात अडथळा निर्माण केला. या प्रकरणी मुख्याध्यापक सिद्दीकी मोहमद इरफान यांच्या फिर्यादीवरून मोहंमद जुबेर याच्याविरूध्द कलम ३५३, ३३२,३८५, ५०४, ५०६ भांदवी प्रमाणे बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि. अंतरप करीत आहेत.