Advertisement

विजेचा शॉक लागून तरुणाचा मृत्यू

प्रजापत्र | Friday, 29/07/2022
बातमी शेअर करा

केज दि.२९ – तालुक्यातील बोरगाव येथे एका २९ वर्षीय तरुणांचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली.

     बोरगाव येथील मनोज गोरख गव्हाणे ( वय २९ ) हा गुरुवारी सकाळी ११ वाजता राजेंद्र गव्हाणे यांच्या इनाम नावाने ओळखल्या जात असलेल्या शेतात काम करीत होता. शेतातील वीज वाहक तारेला ११ के व्ही तारेचा स्पर्श झाल्याने खांबात विद्युत प्रवाह उतरल्यामुळे तेथे काम करीत असलेल्या मनोज गोरख गव्हाणे याला शॉक लागून त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मयताचा चुलत भाऊ नानासाहेब गव्हाणे याने केज पोलीस ठाण्यात दिल्या वरून प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे यांच्या आदेशा वरून बिट जमादार राजू गुंजाळ आणि चंद्रकांत इंगोले यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. प्रेत उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय केज येथे हलवून शवविच्छेदन केले. मनोज गव्हाणे याच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत आहे.

Advertisement

Advertisement