अंबाजोगाई - चिखलात रुतलेल्या ट्रॅक्टरच्या हेड आणि ट्रॉलीच्या मध्ये उभा असलेल्या चालकाचा अचानक हेड उचकल्याने चेंगरून मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी (दि.२३) सकाळी अंबाजोगाई तालुक्यातील पाटोदा ममदापूर येथे झाला.
गंगाधर (पिंटू) बळीराम तोडकर (वय ४२, रा. पाटोदा म.) असे त्या मृत चालकाचे नाव आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितनुसार, गंगाधर तोडकर हे शनिवारी सकाळी दुसऱ्याच्या शेतातटाकण्यासाठी ट्रॅक्टरमध्ये माती भरून घेऊन जात होते. दरम्यान, दोन दिवसापासून परिसरात रिमझिम पाऊस असल्याने चिखल झाला आहे. एका ठिकाणी चिखलात ट्रॅक्टरचे चाक फसल्याने ते हेड आणि ट्रॉलीच्या मध्येउभे राहिले. यावेळी अन्य एका चालकाने त्यांना तिथे उभे न राहण्याबाबत सूचित केले, मात्र खाली चिखलात पाय भरतील म्हणून गंगाधर तिथेच उभे राहिले. यावेळी अचानक हेड समोरच्या बाजूने उचलले गेल्याने हेड आणि ट्रॉलीच्या मध्ये चेंगरून गंगाधर यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी दुपारी पाटोदा येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.