Advertisement

अज्ञात वाहनाच्या धडकेत काळविटाचा मृत्यु

प्रजापत्र | Saturday, 23/07/2022
बातमी शेअर करा

केज दि. २३ - तालुक्यातील साळेगाव येथे अज्ञात वाहनाच्या धडकेने काळविटाचा मृत्यू झाला असून यापूर्वी ही तालुक्यातील दोन्ही राज्यरस्त्यावर मुक्या प्राण्यांचे वाहनांच्या धडकेत जीव गेलेले आहेत.

 

 

            अधिक माहिती अशी की, दि.२३ जुलै शनिवार रोजी दुपारी ३ च्या दरम्यान केज-कळंब रोडवर साळेगाव येथील गांजी पाटी जवळ अज्ञात वाहनाने रस्ता ओलांडीत असलेल्या एका काळविटाला धडक देऊन अज्ञात वाहन पसार झाले. अपघातात काळविटाचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती वन विभाग आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांना मिळताच पोलीस नाईक चंद्रकांत काळकुटे आणि इंगोले हे अपघातस्थळी दाखल झाले. तसेच उपविभागीय वनपाल कंद, उपविभागीय वन अधिकारी चिकटे आणि वनपाल शंकर वरवडे यांच्या आदेशा वरून वनकर्मचारी शाम गायसमुद्रे, विलास मुंडे व जीवन गोके यांनी घटनास्थळी उपस्थित झाले. ते मृत मृतदेह सरकारी वाहनाने घेऊन गेले.
 

 

               दरम्यान घडताच साळेगाव येथील पत्रकार जय जोगदंड, अक्षय वरपे, सादेक शेख, इम्रान शेख यांनी जखमी काळविटास पाणी पाजून त्याचा जीव वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यात त्यांना यश आले नाही.
 

Advertisement

Advertisement