अंबाजोगाई - तालुक्यातील पट्टीवडगाव येथे चंदन तस्कर एका शेतात लाकडं तोडून त्याचा गाभा काढत असल्याची माहिती पंकज कुमावत यांना मिळाल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी छापा मारला असता 29 किलो चंदनाच्या लाकडासह 1 लाख 93 हजार 350 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई गुरुवारी संध्याकाळी साडेसहा वाजता करण्यात आली.
अंबाजोगाई तालुक्यातील पट्टीवडगाव येथे नारायण लव्हाळे यांनी त्यांच्या शेतात चंदनाची झाडे तोडून आणली होती. त्याचा गाभा काढत असल्याची माहिती सहायक पोलीस अधिक्षक कुमावत यांना मिळाली. त्यावरून त्याठिकाणी धाड मारली असता चंदनासह मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी बर्दापूर पोलीस ठाण्यात बाबासाहेब बांगर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली बाबासाहेब बांगर, बालाजी दराडे, राजू वंजारे, दिलीप गिते, रामहरी भंडारे, संजय टुले यांनी केली.