Advertisement

धारूर घाटात पुन्हा अपघात

प्रजापत्र | Wednesday, 13/07/2022
बातमी शेअर करा

किल्लेधारूर दि.१३(वार्ताहर ) पंढरपूर हुन परभणी जिल्ह्यात पोखर्णी कडे १०० वारकरी घेऊन जाणाऱ्या ट्रक क्र एम एच ११ एम ४०१८ या ट्रक ब्रेक फेल झाल्या ने चालकाने हुषारी दाखवल्याने धारूर चे अवघड घाटात अपघाता पासून वाचवला. धारूर शहरातील सामाजीक कार्यकर्ते व पोलीस यांनी मदत करून या वारकरी मंडळीला अधार देत त्यांची सोय करून गावा कडे सुरक्षीत पणे रवाना केले.

 

धारूर शहरातून ५४८ सी महामार्ग गेला आहे या महामार्गावर अडीच किमी चा अरुंद व करळ घाट लागतो या घाटावर आज वर अनेक अपघात होऊन जीवित हानी झाली आहे दि १३ जुलै रोजी पंढरपूर वारी साठी गेलेल्या परभणी जिल्ह्यातील पोखर्णीचे वारकरी यांची गाडी ट्रक क्र.एम एच ११ एम ४०६८ ने गावी जात असताना धारूर घाटात ब्रेक फेल झाल्याने अपघात झाला. यावेळी चालकाच्या तत्परतेने चालकाने ट्रक रस्त्याच्या कठड्यावर आदळला यात सुदैवाने जीवित हानी झाली नाही. या ट्रक मध्ये १०० वारकरी होते ही माहिती कळताच धारूर येथील सामाजिक कार्यकर्ते संतोष सिरसट, बाळू सिरसट, सादेक इनामदार, ऋषीकेश फुके यांनी यावेळी मदत केली. वाहनाची व्यवस्था करून त्यांना त्यांचे गावी रवाना केले. हि माहिती कळताच पोलीस प्रशासनाचे पी.एस.आय भालेराव, एएसआय गोविंद बाष्टे, निंगुळे, बहीरवाल,जाधव उपस्थित होते. या वारकरी मंडळीला त्यांचे गावा कडे रवाना केले.

Advertisement

Advertisement