Advertisement

विद्यार्थ्याचा तलावात बुडून मृत्यू

प्रजापत्र | Friday, 08/07/2022
बातमी शेअर करा

अंबाजोगाई : तलावात बुडून मौजे भारज येथील विद्यार्थ्याचा सोलापूर या ठिकाणी मृत्यू झाला आहे. ही दुःखद घटना गुरुवारी सायंकाळी हिप्परगा तलावात घडली. आदित्य अजित चव्हाण (वय 21, रा. भारज, ता. अंबाजोगाई) असे मयत विद्यार्थ्याचे नाव आहे. या घटनेमुळे भारज गावावर शोककळा पसरली आहे.

 

या बाबत प्राप्त माहिती अशी की, सोलापूरातील केगाव येथील पं. दिनदयाळ उपाध्याय डेंटल कॉलेजमध्ये आदित्य पहिल्या वर्षाला शिकायला होता. काल गुरुवारी सायंकाळी आदित्य त्याच्या मित्रांसमवेत हिप्परगा तलाव परिसरात फिरायला गेला होता. तलाव परिसरात फिरताना अचानक पाय घसरून आदित्य पाण्यात पडला. गाळामध्ये अडकल्याने त्याला बाहेर निघता आले नाही. सोबत असलेल्या मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना यश आले नाही. आज शुक्रवारी सकाळी आदित्यचा मृतदेह सापडला.

 

हिप्परगा तलाव परिसरात गेल्यानंतर आदित्यने त्याच्या मोबाईलवरून आईसोबत संवाद साधला होता. घटनेची माहिती कळताच कुटुंबीय, नातेवाईक सोलापुरात दाखल झाले. आदित्यला आई, वडील आणि एक लहान भाऊ आहे. या घटनेमुळे भारज गावांत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Advertisement

Advertisement