Advertisement

अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त शिबीर !

प्रजापत्र | Thursday, 07/07/2022
बातमी शेअर करा

बीड, दि.07 (प्रतिनिधी) शारदा प्रतिष्ठान, गेवराई आणि साधू वासवाणी मिशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि.24 जुलै रोजी गेवराई येथे मोफत कृत्रिम हात व पाय शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरात अद्यावत टेक्नॉलॉजीद्वारे फायबर पासून तयार केलेले अत्यंत हलके व मजबुत कृत्रिम हात व पाय दिव्यांगांना मोफत दिले जाणार आहेत. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विजयसिंह पंडित यांच्या पुढाकारातून या शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. बीड जिल्ह्यातील गरजू दिव्यांगांनी शिबीरासाठी नाव नोंदणी करण्याचे आवाहन त्यांनी केले.

 

 

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शारदा प्रतिष्ठान, गेवराई आणि साधु वासवाणी मिशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि.24 जुलै रोजी शारदा विद्यामंदिर, गेवराई येथे मोफत कृत्रिम हात व पाय शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरात अद्यावत टेक्नॉलॉजीद्वारे फायबर पासून तयार केलेले हलके आणि मजबुत कृत्रिम हात व पाय यांचे दिव्यांगांना मोफत वाटप केले जाणार आहे. या कृत्रिम अवयवामुळे मनुष्य चालू शकतो, सायकल चालवू शकतो, टेकडी चढू शकतो आणि सर्व दैनंदिन कामे करू शकणार आहे. या शिबीरासाठी नाव नोंदणी सुरु असून त्यासाठी मोबाईल क्र.9822459100, 9767894229, 9420422224 व 9423714847 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन शिबीराचे आयोजक तथा बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी केले आहे.

 

 

बीड जिल्ह्यातील गरजू दिव्यांग या शिबीरामध्ये सहभागी होवू शकतात, रविवार, दि.24 जुलै रोजी पुणे येथील नामांकित अस्थिरोग तज्ञ आणि साधु वासवाणी मिशन येथील तज्ञ दिव्यांगांची तपासणी करून अवयवाची मोजमापे घेणार आहेत. सुमारे 40 दिवसानंतर प्रत्यक्ष कृत्रिम अवयवाचे मोफत वाटप केले जाणार आहे. जास्तीत जास्त दिव्यांगांनी या शिबीराचा लाभ घेण्याचे आवाहन यानिमित्ताने करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस तथा शारदा प्रतिष्ठानचे कार्यवाह अमरसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली होत असलेल्या शिबीरामध्ये बीड जिल्ह्यातील गरजूंनी तात्काळ नोंदणी करण्याचे आवाहनही शेवटी करण्यात आले.
 

Advertisement

Advertisement