Advertisement

राष्ट्रीय महामार्गावर चोरांचा सुळसुळाट

प्रजापत्र | Monday, 04/07/2022
बातमी शेअर करा

किल्लेधारूर - राष्ट्रीय महामार्ग क्र.५४८ सी वरील धारूर ते तेलगाव या दरम्यान  आरणवाडी साठवण तलावाच्या जवळ राहणारे अशोक मच्छिंद्र चव्हाण यांच्या घरी अज्ञात चोरट्याने सोमवारी पहाटेच्या वेळी चोरी करण्याच्या हेतूने घरात प्रवेश करून आईला धमकावत तिच्या अंगावरील सात ग्राम अंदाजे किंमत ३५ हजार रुपयांचे सोने लंपास करण्याचा प्रकार केला. हा चोर मोटरसायकल वर पसार झाला   पाठलाग केला असता मात्र हा सापडला नाही. या प्रकरणी धारूर पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आली आहे.

धारूर तेलगाव रस्त्यावर आरणवाडी तलावाच्या जवळ स्वतःचे दुकान व घर असणाऱ्या अशोक मच्छिंद्र चव्हाण यांच्या घरात समोरील पत्र्याच्या शेडमध्ये सोमवारी पहाटेच्या वेळी अज्ञात चोरट्याने प्रवेश करून बाहेर झोपलेले तक्रारदाराची आई निर्मला मच्छिंद्र चव्हाण यांना उठवले व त्यांना धमकावत त्यांच्या अंगावरील मंगळसूत्र व इतर सोन्याचे साहित्य  सात ग्राम सोने हे त्यांच्या कडून काढून घेतले. महिलेने आरडाओरड केल्यानंतर  हा चोरटा पसार झाला. महिलेने ओरडा ओरड करताच घरातील इतर मंडळी जागा होऊन या चोरट्याचा तेलगाव रस्त्याला  पाठलाग केला असता तो मोटरसायकल क्रमांक एम एच १५ ई के  १८७१  या पॅशन प्रो गाडीवर पसार होताना दिसला. रस्त्यावर त्याला अडवले असता त्याने धारदार शस्त्राने  धमकावत आपला मार्ग बदलत येथून पसार होण्यास तो यशस्वी झाला. या परिसरात चोरीचे प्रकार वाढले असून नेहमीच घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे या भागातील नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या चोरी प्रकरणी अशोक मच्छिंद्र चव्हाण यांच्या तक्रारीवरून धारूर पोलीस स्टेशनमध्ये या चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Advertisement

Advertisement