बीड - बांधकामासाठी खोदण्यात आलेल्या एका खड्ड्यातील पाण्यात बुडून सहा वर्षीय बालकाचा दुर्दैवपणे मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी विठ्ठल साई मंदिर परिसरातील फुलाईनगर भागात घडली.
हर्षद जगताप (वय 6 वर्ष) हा बालक खेळता खेळता घराच्या समोर असलेल्या पाण्याच्या खड्ड्यात पडला व यामध्ये त्याचा दुर्दैवीरित्या मृत्यू झाला. जगताप यांच्या घरासमोर बांधकाम सुरू आहे. त्याठिकाणी पाण्यासाठी खड्डा खोदण्यात आला होता. त्यात पाणी असल्याने या पाण्यात या बालकाचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येते. या घटनेने सदरील परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
बातमी शेअर करा