Advertisement

अज्ञात वाहनाच्या धडकेत वारकऱ्याचा मृत्यु

प्रजापत्र | Thursday, 30/06/2022
बातमी शेअर करा

अंबाजोगाई - विठूरायाच्या भेटीसाठी पंढरपूराला पायी दिंडीत निघालेल्या एका वृध्द वारकर्‍याला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत वारकर्‍याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना अंबाजोगाई तालुक्यातील अंबाजोगाई ते लोखंडी सावरगाव रस्त्यावरील पेट्रोल पंपाजवळ 28 जून रोजी घडली. याप्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलिसात काल अज्ञात वाहनाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

हिंमतराव किसनराव पांढर (वय 68, रा.धर्मापुरी ता.नांदगाव खार्डेश्‍वर जि.अमरावती) हे आपल्या गावातील विठ्ठल रूखमाई दिंडीत सामील होवून विठूरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे निघाले होते. ते पायी चालत असताना 28 जून रोजी अंबाजोगाई लोखंडी सावरगाव रस्त्यावरील पेट्रोल पंपाजवळ त्यांना अज्ञात वाहनाने जोराची धडक देवून वाहन निघून गेले. दिंडीतील सहकारी वारकर्‍यांनी त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषीत केले. याप्रकरणी मयत हिंमतराव पांढर यांचा मुलगा निरंजन पांढर यांनी काल अंबाजोगाई ग्रामीण पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात वाहनधारकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक फौजदार मिसाळ हे करत आहेत.
 

Advertisement

Advertisement