Advertisement

थेरगाव येथील जवान सूर्यकांत तेलंगे शहीद

प्रजापत्र | Monday, 27/06/2022
बातमी शेअर करा

लातूर : मौजे थेरगाव, ता. शिरूर अनंतपाळ येथील जवान सुर्यकांत शेषेराव तेलंगे
हे कर्तव्य बजावत असताना पठाणकोट येथे शहिद झाले असल्याचा निरोप गावात मिळताच आज गावकऱ्यांनी सर्व व्यवहार बंद ठेवला. शहिद सुर्यकांत तेलंगे यांचा
पार्थिव उद्या मंगळवारी दुपारी थेरगावात येईल, अशी माहिती गावकऱ्यांना पोलिसांकडून मिळाली असल्याचे सांगण्यात आले. सुर्यकांत शेषेराव तेलंगे हे सैन्यदलात ७ वर्षांपूर्वी भरती झाले होते. ते एका शेतकरी कुटुंबातून होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. सुर्यकांत तेलंगे हे अत्यंत
नमिळाऊ असे आमच्या गावचे सुपूत्र होते. ते हिद झाल्याचे कळताच थेरगाव गावावर शोककळा पसरली आहे,शी खंत गावातील प्रतिष्ठीत नागरिक राजकुमार पाटील, धनंजय पाटील यांनी दिली आहे. शहिद जवान सुर्यकांत तेलंगे यांच्या पार्थिवावर गावामध्ये नेमके कोठे अंत्यसंस्कार करायचे हे महसूल प्रशासनाचे अधिकारी आल्यानंतर निश्चीत रण्यात येईल, असेही सांगण्यात आले. थेरगाव येथील जवान सुर्यकांत तेलंगे शहिद झाल्याची बातमीकळताच गाव, तालुक्यातून तसेच जिल्हाभरातून हिद जवानास श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.

 

Advertisement

Advertisement