Advertisement

चार महिन्यापासून फरार असलेला आरोपी पकडला

प्रजापत्र | Monday, 27/06/2022
बातमी शेअर करा

किल्लेधारूर दि.27 जुन – पंकज कुमावत (Pankaj Kumawat) यांच्या पथकाने चार महिन्यापुर्वी धारुर तालुक्यातील भोगलवाडी येथून बलात्कार प्रकरणात फरार असलेल्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. गेली चार महिने पोलिस आरोपीच्या पाळतीवर होते.

 

 

धारूर पोलीस स्टेशन हद्दीतील गु.र.नं. 18/2022 भादंवि कलम 376 मधील आरोपी नामे महेश वैजनाथ तिडके रा. भोगलवाडी ता. धारूर जि. बीड हा चार महिन्यांपासून फरार होता. आरोपी महेश वैजनाथ तिडके यास पंंकज कुमावत यांच्या पिंक पथकातील पोलिस उपनिरिक्षक कोळी मॅडम, सायबर पोलीस (Cyber Police) अनिल मंदे, शिवाजी कागदे, चालक पोलिस हवालदार सय्यद यांनी पुण्यातून ताब्यात घेतले आहे.

 

 

गेली काही दिवस बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात महिला अत्याचाराच्या घटनांत वाढ झाली असल्याचे दिसून येते. धारुर पोलिस हद्दीतही शहर व तालुक्यात अशा घटनांची नोंद झाली आहे. तर अंबाजोगाई येथील अत्याचाराच्या घटनेने अवघे महाराष्ट्र हादरले होते. अशा घटनांमधील फरार आरोपींचा शोध घेण्यात केज उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय यशस्वी ठरत असून सहाय्यक पोलिस अधिक्षक ( Additional Superintendent of Police ) पंकज कुमावत व पिंक पथकाचे अभिनंदन होत आहे.

 

 

( The accused in Dharur taluka smiled; Action of Pankaj Kumawat’s team. )

Advertisement

Advertisement