Advertisement

लाच घेतला भूमापकाला पकडले

प्रजापत्र | Thursday, 23/06/2022
बातमी शेअर करा

बीड दि.२३ (प्रतिनिधी)-येथील भूमी अभिलेख कार्यालयातील भूमापक शेख अब्दुल अतिख (वय-३८ रा. ताकडगाव रोड, गेवराई, ता, गेवराई) याने तक्रारदारास एक हजार रुपयांची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बीड एसीबीने गुरुवारी (दि.23) केली.दोन दिवसांत बीड जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दुसरी कारवाई केली आहे. 

 

     तक्रारदार यांचे आईचे नावे चौसाळा येथे असलेल्या प्लॉटची मोजणी करून हद्द कायम करून घेण्यासाठी शासकीय चलन भरून भूमी अभिलेख कार्यालयात अर्ज केला होता, आरोपी भूमापक शेख अब्दुल अतिख यांने सदरच्या प्लॉटची मोजणी मार्च 2022 मध्ये करून हद्द कायम करून दिली केलेल्या कामाकरिता 17 जून 2022 रोजी दोन मजुरांची मजुरी प्रत्येकी 500 रुपये असे 1000 रुपये लाचेची मागणी केली. एक हजार रुपये लाच रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस स्टेशन बीड येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई एसिबीचे उपाधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक अमोल धस श्री. अमोल धस, पोलीस अमलदार भरत गारदे, अविनाश गवळी यांनी केली.

Advertisement

Advertisement