Advertisement

अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या

प्रजापत्र | Thursday, 23/06/2022
बातमी शेअर करा

केज दि.23 जुन – धारुरनंतर आता केज तालुक्यात आत्महत्या उघडकीस आली आहे. केज तालुक्यातील नांदूरघाट येथे एका अल्पभूधारक शेतकऱ्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज (दि.23) गुरुवारी सकाळी उघडकीस आली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 

 

मधुकर निवृत्ती जाधव ( वय 70 ) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. आज सकाळी जांभळ बेट शिवारातील बाभळीच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच नांदूरघाट पोलीस चौकीचे जमादार भालेराव आणि शेख रशीद यांनी घटनास्थळी धाव घेतली.

 

 

घटनास्थळाचा पंचनामा करुन नांदूरघाट ग्रामीण रुग्णालयात मृतदेह शवविच्छेदनासाठी आणण्यात आला. मधुकर जाधव यांनी रात्रीच गळफास घेऊन आत्महत्या केली असावी अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. पत्नीचा आजार व नाजूक आर्थिकस्थिती यामुळे त्यांनी आत्महत्या केली असावी अशी चर्चा आहे. सदरील घटनेची आकस्मात नोंद घेत पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

 

दरम्यान, बीड जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरुच असुन मराठवाड्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या बीड जिल्ह्यात नोंद झाल्या आहेत. नुकतेच चार दिवसांपुर्वी धारुर तालुक्यातील एका तरुण शेतकऱ्याने मुलीच्या लग्नाला महिना लोटला असताना कर्जबाजारीपणाच्या तणावातून आत्महत्या केली होती. हि घटना ताजी असतानाच पुन्हा केज तालुक्यात शेतकरी आत्महत्येची घटना घडली आहे.

( Farmer suicide season continues in Beed district; After Dharur, now suicide in Kaij taluka. )
 

Advertisement

Advertisement