Advertisement

डॅमेज कंट्रोलसाठी सरसावले शरद पवार

प्रजापत्र | Wednesday, 22/06/2022
बातमी शेअर करा

मुंबई : राज्यत निर्माण झालेल्या पेच प्रसंगाच्या पार्श्वभूमीवर आत डॅमेज कंट्रोलसाठी शरद पवार सरसावले आहेत. एकनाथ शिबंदीचे बंद मोडून काढण्यासाठी
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना मुख्यमंत्री करा, असा सल्ला उद्धव ठाकरे यांना देण्यात आला आहे. दस्तुरखुद्द राष्ट्रवादी अध्यक्ष यांनी शरद पवारांनी (Sharad Pawar) शिंदेना मुख्यमंत्रीपद देण्याचा सल्ला उद्धव ठाकरे यांना दिल्याची माहिती आहे.

 

दरम्यान  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांना आवाहन केलं आहे. उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधल्यानंतर शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल झाले आहेत. या बैठकीत शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांमध्ये काय चर्चा होणार? पवार मुख्यमंत्र्यांना आता कोणता सल्ला देणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 

Advertisement

Advertisement