Advertisement

कर्करोगाने घेतला बालकाचा जीव

प्रजापत्र | Thursday, 16/06/2022
बातमी शेअर करा

किल्लेधारूर दि.16 (वार्ताहर): कर्करोग आजारामुळे एका दहा वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यु झाल्याची घटना बुधवारी पहाटे  घडली. या घटनेने अख्या गावावर शोककळा पसरली.
वेदांत प्रताप शेप (रा.कांदेवाडी ता.धारुर) मयत बालकाचे नाव असून औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयात वेदांत वर गेल्या पंधरा दिवसांपासून उपचार चालू होते. ब्रेन ट्यूमर नावाचा कर्करोगाने वेदांतला ग्रासले होते. उपचारादरम्यान वेदांतची प्राणज्योत बुधवारी पहाटे चार वाजण्याच्या दरम्यान मालवली. शोकाकुल वातावरणात कांदेवाडीत वेदांतवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने अख्ख्या गावावर शोककळा पसरली आहे. धारुर  पंचायत समितीचे माजी सभापती बाळासाहेब खाडे यांचा तो भाच्चा होता.

Advertisement

Advertisement