अंबाजोगाई-सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी जनावरेची कत्तल,अवैद्य धंदे,वाळू चोरांविरुद्ध कडक मोहिम राबविण्यास सुरुवात केली असून अंबाजोगाईत काल ५० लाखांचा वाळू साठा पोलिसांनी जप्त केला आहे.
सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी अंबाजोगाई येथील अहिल्यादेवी नगर, मांडवा रोड येथे निसार शहा मीर शहा याने त्याच्या जागेत विनापरवाना व बेकायदेशीररित्या वाळूचा साठा करून ठेवला असल्याची माहिती मिळाली होती.त्यानुसार पोलीस हेडकॉन्स्टेबल बालाजी दराडे , राजू वंजारे व अंबाजोगाई तहसील कार्यालयाच्या पथकाचे मंडळाधिकारी गोविंद जाधव,तलाठी फुलचंद सिरसाट,राम मगर व केदार यांच्या पथकाने छापा मारून १५२ ते १५५ ब्रास वाळू ज्याची किंमत अंदाजे ४५ ते ५० लाखांची घरात आहे.पोलिसांनी ही वाळू जप्त केली असून निसार शहा याच्याकडे अधिक चौकशी केली असता हा वाळू साठा संजय सुराना (रा.अंबाजोगाई) यांचा असून त्याने ही वाळू निसार शहा व मैनोद्दीन निजाम शहा यांचे जागेत ठेवली आहे असे सांगितले.या प्रकरणी निसार शहा व मैनोद्दीन निजाम शहा व संजय सुराणा याची अवैध वाळू साठाबाबत तहसील कार्यालय नोटीस देवून चौकशी करतील.दरम्यान यात दोषी आढळून आल्यानंतरच या तिघाविरुद्ध अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
बातमी शेअर करा