Advertisement

अंबाजोगाई नगर परिषदेचे प्रभाग निहाय आरक्षण जाहीर

प्रजापत्र | Monday, 13/06/2022
बातमी शेअर करा

अंबाजोगाई - ३१ नगर परीषद सदस्य संखेसाठी होणा-या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अखेर आज आरक्षणाची सोडत काढण्यात आली. नगर परीषदेच्या आगामी सभागृहात आता अनुसुचित जाती प्रवर्गातुन ५ ; महिला प्रवर्गातुन १३ तर सर्वसाधारण प्रवर्गातुन १३ असे एकुण ३१ सदस्य निवडुन जाणार आहेत. शहरातील १५ प्रभागातुन निवडल्या जाणाऱ्या ३१ उमेदवारांचे आरक्षण जाहीर झाले असल्यामुळे इच्छुक उमेदवार आता तयारीला लागले आहेत.
नगर परिषदेच्या विलासराव देशमुख सभागृहात उपविभागीय अधिकारी शरद झाडके यांच्या उपस्थितीत मुख्याधिकारी अशोक साबळे यांनी हे आरक्षण जाहीर केले. यंदाच्या निवडणुकीत अंबाजोगाईत एकूण १५ प्रभाग असून त्यातून ३१ सदस्य निवडून दिले जाणार आहेत. या ३१ सदस्यात १६ महिला आणि १५ पुरुष असतील. प्रभाग १ ते प्रभाग १४ पर्यंत प्रत्येक प्रभागात एक महिला आणि एक पुरुष तर प्रभाग १५ मध्ये दोन महिला आणि एक पुरुष सदस्य असेल. अनुसुचीत जातीसाठी पाच जागा आरक्षित असून त्यापैकी तीन महिला तर दोन पुरुष उमेदवार असणार आहेत.
अंबाजोगाई नगर परीषदेच्या सार्वत्रिक निवडणुकांची तयारी आता पुर्णत्वास येवू लागली आहे. या ३१ सदस्यांपैकी ५ सदस्य अनुसूचित जाती प्रवर्गातुन १३ सदस्य महिला प्रवर्गातुन तर १३ सदस्य सर्वसाधारण प्रवर्गातुन निवडले जाणार आहेत.

या सोडतीत जाहीर करण्यात आलेले आरक्षण खालील प्रमाणे आहे.
प्रभाग क्रमांक १

अ - महिला
ब - सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक २
अ - महिला
ब - सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक ३
अ-महिला
ब - सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक ४
अ-महिला अनुसूचित जाती
ब-सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक ५
अ-महिला
ब-सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक ६
अ-महिला
ब-सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक ७
अ-महिला
ब-सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक ८
अ-महिला
ब-सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक ९
अ-महिला
ब - सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक १०
अ-महिला
ब-सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक ११
अ- अनुसूचित जाती सर्वसाधारण
ब-महिला

प्रभाग क्रमांक १२

अ - महिला अनुसूचित जाती
ब - सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक १३
अ - अनुसूचित जाती सर्वसाधारण
ब - महिला

प्रभाग क्रमांक १४
 अ - महिला
ब - सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक १५
अ -महिला अनुसूचित जाती
ब - महिला
क-सर्वसाधारण

Advertisement

Advertisement