Advertisement

अवैध गर्भपात प्रकरणातील अखेर तो डॉक्टर पकडला

प्रजापत्र | Sunday, 12/06/2022
बातमी शेअर करा

बीड-अवैध गर्भपात प्रकरणातील आरोपी असलेल्या डॉ.सतीश सोनवणेला अखेर बीड पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती पत्रकार परिषदेत पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिली आहे. सतीश सोनवणे हा वैद्यकीय शिक्षण घेत होता.त्याला अहमदनगर येथून अटक करण्यात आली आहे.
            शीतल गाडे (वय ३०, रा. बकरवाडी, ता. बीड) या महिलेचा अवैध गर्भपातादरम्यान ५ जून रोजी मृत्यू झाला. या प्रकरणात पिंपळनेचे उपनिरीक्षक एम.एन. ढाकणे यांच्या फिर्यादीवरून पती गणेश सुंदरराव गाडे, सासरा सुंदरराव बाबुराव गाडे (दोघे रा. बकरवाडी, ता. बीड), भाऊ नारायण अशोक निंबाळकर (रा. शृंगारवाडी, ता. माजलगाव), अंगणवाडी सेविका मनीषा शिवाजी सानप (रा.अर्धमसला, ता. गेवराई), प्रयोगशाळा तंत्रज्ञ वासुदेव नवनाथ गायके (रा. आदर्शनगर, बीड), सीमा सुरेश डोंगरे यांच्याविरोधात पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला. त्यातील सीमा हिने पाली येथील तलावात आत्महत्या केली. इतर पाचही आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून मनीषा कारागृहात आहे, तर इतरांना १४ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

 

Advertisement

Advertisement