Advertisement

घरात आढळला मृतदेह

प्रजापत्र | Saturday, 11/06/2022
बातमी शेअर करा

केज दि.- येथील फुले नगर भागातील घरात एका 45 वर्षीय इसमाचा मृतदेह आढळून आला असून सदर इसम हा एकटाच घरात राहत असल्याचे सांगण्यात येत आहे.

शनिवार दि 11 रोजी केज येथील महात्मा फुले नगर या भागातील एका घरातून दुर्गंधी येत असल्याची माहिती नागरिकांनी पोलीसांना दिली. माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे, पोलीस उपनिरीक्षक वैभव सारंग, अशोक नामदास आणि शमीम पाशा यानी घटनास्थळी जाऊन पाहाणी केली असता त्यांना घरात सडलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. तो मृतदेह हा सुनील किसन हजारे वय (45 वर्ष) याचा असल्याचे स्पष्ट झाले.

सुनिल हजारे हे केज येथे एकटेच राहत होते. त्यांचे कुटुंब बीड येथे राहत आहे. त्यांचा मृत्यू हा हृदय विकाराच्या झटक्याने झाला असावा; परंतु घरी कोणी नसल्याने त्यांचा मृतदेह घरात पडून राहिला असा अंदाज व्यक्त होत आहे.

Advertisement

Advertisement